डिजिटल क्रांतीने ‘न्यूज’चं ‘नॉईज’मध्ये, ‘सेन्स’चं ‘सेन्सेशन’मध्ये आणि ‘क्रेडिबिलीटी’चं ‘केऑस’मध्ये रूपांतर केलं आहे!

नवीन माध्यमं आणि तंत्रज्ञानामुळे झालेला मोठा बदल म्हणजे लोकांचा माहितीचा स्त्रोत बदलला आहे. आता पारंपरिक (Traditional Media) नाही, तर नव्या माध्यमांद्वारे लोकांना बातमी आधी कळते. माध्यमांच्या दृष्टीनं हा खूपच मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे, नव्या माध्यमांचा असलेला वेग. नव्या तंत्रज्ञानामुळे ज्या क्षणाला घटना घडते, त्याच क्षणाला ती लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे वृत्तपत्र आणि टीव्ही या पारंपरिक माध्यमांना धक्का बसला आहे.......